८ नोव्हेंबर २०१७ रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. ह्या नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर टीका केल्या. अनेक लोकांचा काळापैसा जप्त करण्यात आला. जुन्या ५०० आणि १००० च्या चलनी नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या आणि नवीन ५०० आणि २००० च्या नोटा चलनात आल्या. २००० च्या नोटा चलनात आल्या नंतर सुद्धा सरकारवर खूप टीका करण्यात आल्या. परंतु त्या नंतर झालेल्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड च्या निवडणुकीत भा.ज.पा. ला बहुमत मिळाले आणि त्यांनी सरकार स्थापन करून विरोधकांना चोख उत्तर दिले. त्यानंतर अनेकदा हा विषय चर्चेत आला कि २००० ची नोट बंद करणार का? परंतु नोटेच्या निश्चलीकरणाचा कुठलाही विचार नाही असे सरकारने जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी रिझर्व बँकेने २००० च्या नोटांची मर्यादित छपाई करण्यात येण्याचे सांगितले होते. त्यामुळेच दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews